ताज्या घडामोडी
अनंत विभूषित जगद्गुरु श्री.नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान आयोजित महारक्तदान शिबिर
ज्ञानेश्वर पोटे

आज दि.१२/०२/२०२४ रोजी हनुमान नगर मनमाड येथील सद्गुरु नरेंद्र महाराज सत्संग सभागृह मंडपात महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.या याप्रसंगी 261 रक्तदात्यांनी रक्तदान केले,रक्तदाते रक्तदान करण्यास सामाजिक तसेच राजकीय सर्व क्षेत्रातील समाजसेवक नरेंद्र महाराज भक्त मंडळ यांनी गर्दी करून रक्तदान करण्यास उत्साह दाखवला परंतु फक्त 261 पिशव्या उपलब्ध असल्याने पिशव्यांअभावी अनेक रक्तदात्यांना रक्तदान करण्यापासून इच्छा असूनही वंचित रहावे लागले.रक्तदात्यांना सस्तंग मंडळाकडून चहा, बिस्कीट,नाश्ता,सुंदर पाणी अशी व्यवस्था करण्यात आली होती.अशी सविस्तर माहिती समाजसेवक श्री.भागवत झाल्टे यांनी पत्रकारांना दिली.