
कोटमगाव – सविस्तर वृत्त असे की, माणिक रघुनाथ मढवई विद्यालयात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी श्री.शेवाळे दिगंबर तुळशीराम साहेब.यांचे विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता माणिक मढवई मॅडम यांनी शेवाळे साहेबांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.तसेच.श्री केदारे सर श्री गांगुर्डे सर यांनी.प्रा.श्री पगार संदीप सर(एस एन जे बी.)महाविद्यालय चांदवड व कु पार्थ शेवाळे यांचे पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन स्वागत केले.
श्री.गलांडे सर यांनी त्यांचे जिवलग मित्र श्री. शेवाळे साहेब व प्रा.पगार सर यांचा परिचय करून दिला. व सूत्रसंचालन केले
इ.१०वी.ची विद्यार्थिनी कू.समीक्षा गांगुर्डे हिने आपले मनोगत व करीयर मार्गदर्शना
विषयी आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या.करीयर विषयी विद्यार्थ्यांना.मार्गदर्शन करताना श्री शेवाळे साहेब यांनी सांगितले,विद्यार्थ्यांकडून पालकांच्या अपेक्षा खूप वाढल्या असून विद्यार्थ्याचा बुध्यांक, आवड न बघता आपल्या अपेक्षांचे ओझे विद्यार्थ्यांवर लादले जात आहे.तुम्ही कोणतेही आवडीचे शेत्र निवडा व त्यात टॉपर बना. स्पर्धा परीक्षांसाठी ७/८लाख विद्यार्थी बसतात. त्यात काही हजार विद्यार्थीच तुमचे खरे स्पर्धक असतात.तुम्ही क्रीडा,व्यापार,खेळ,कृषी,आयातनिर्यात,उद्योग,कुठल्याही विभागात मन लाऊन काम करा.खूप कष्ट करा व यशस्वी व्हा.
आई,वडील शिक्षक,मित्र सर्वांशी प्रामाणिक रहा.कुणाचा तळतळाट घेऊ नका खोटे बोलू नका ,आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा. आपला मित्र मैत्रीण ह्या साईडला गेली मग आपण तीच साईड घेऊ नका. दुसऱ्याच्या मागे धावू नका.
सगळ्याच शेत्रात कॉम्पिटिशन आहे. म्ह.घाबरु नका.जिद्द,चिकाटी व आत्मविश्वास,प्रयत्न, व कष्ट करून तुम्ही सर्व काही मिळऊ शकतात.विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर योग्य कारणासाठी व मर्यादित करावा.१२वी पर्यतचे वय खूप अवखळ असते,चांगले मित्र जोडा .वाहत गेले तर आयुष्य उद्ध्वस्त होईल.
श्री.शेवाळे साहेब यांनी.चेंद्रेश्र्वर मंदिर परिसरात हजारो झाडे लावली आहे. व त्यांच्या संगोपनासाठी ते.दर ८/१५ दिवसातून डोंगरावर जाऊन स्वतः झाडांचे संगोपन करतात. त्यांनी स्वतः २५हजार लिटर पाण्याची टाकी मंदिर परिसरातील झाडांच्या संगोपनासाठी ३ वर्षा पूर्वी घेतली. आहे.त्यांच्या समाजसेवेचे कार्य खूप मोठे आहे.
श्री.संदीप पगार सर यांनी विद्यार्थ्यांना विविध प्राण्यांचे आवाज काढून दाखविले व मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका श्रीमती अनिता माणिक मढवई मॅडम यांनी श्री.शेवाळे साहेब,श्री.पगार संदीप सर यांचे विद्यार्थ्यांना करीयर मार्गदर्शन केल्याबद्दल आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. गलांडे सर श्री केदारे सर श्री गांगुर्डे सर, श्री कदम सर श्री दिवटे सर श्री देवडे सर व कू.सार्थक गुरगुडे,कू स्वयम् शिरसाठ व सर्व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.