ताज्या घडामोडी
अखेर भाटगांव तालुका चांदवड ग्रामपंचायत प्रतिनिधी श्री. गवळी यांच्या माध्यमातून पिण्यासाठी पाण्याचा टँकर सुरू
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव- सध्या दुष्काळाची परिस्थिती सगळीकडे जाणवत आहे,त्यात पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या पाण्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. भाटगांव तालुका चांदवड येथील ग्रामपंचायत सदस्य व प्रतिनिधी श्री.अशोक गवळी यांनी चांदवड पंचायत समितीतील बी.डी.ओ.श्री.साबळे साहेब यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून पिण्याच्या पाण्याची टँकरची सोय करून देण्याबाबत विनंती अर्ज केला होती.श्री.अशोक गवळी यांच्या विनंती अर्जाचा गांभीर्याने विचार करून बी. डी.ओ.श्री.साबळे साहेबांनी पाण्याचा टँकर भाटगांवला उपलब्ध करून दिला.पाण्याची कमतरता जानवत आहे तरी,सर्व ग्रामस्थांना विनंती कि,पाणी जपुन वापरावे आज सद्ध्या प्रत्येकाला पाण्याची गरज आहे. असे आव्हान ग्रामपंचायत प्रतिनिधी श्री.अशोक गवळी यांनी सर्व ग्रामस्थांना केले आहे.