बोलठाण सह परिसरात गारपीट पुन्हा पावसाचा जोर व वादळी वाऱ्या सह विजांचा कडकडाट
अजिज खान पठाण

नांदगाव तालुक्यातील बोलठाण सह घाटमाथा परिसरात रविवारी सायंकाळी 6 वाजे सुमारास जोरदार पावसासह गारपीट झाली रात्री पुन्हा पावसाचा जोर व वादळी वाऱ्या सह विजांचा कडकडाट हजरी लावली या मुळे शेत शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
तसेच रात्री पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याचा अंदाजही वर्तवला जात आहे.
नांदगाव तालुका परिसरात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात सह आवकळी गारपिटीमुळे उन्हाळी कांदे,कांद्याचे डोंगळे आदी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे आवकळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे,पिकासाठी घेतले ले पीक कर्ज कसे परतफेड करायचा या प्रश्नांनाने बळीराजा हतबल झाला आहे,शेतामध्ये सहा ते आठ इंच पर्यंत गारांचा थर जमला होता
राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी चर्चा होत असून मदतीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार बीड येथे म्हणाले.