
लासलगाव परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी रात्री 8 वाजे सुमारास पावसाने हजेरी लावली अचानक आलेल्या पाऊस मुळे शेतकऱ्यांनी धावापड झाली काही ठिकाणी कांदे कडणी सुरू आहे तर काही ठिकाणी गहू झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली
या आर्धा तास चालेला पाऊस मुळे
रस्ता वर मोठया प्रमाणात पाणी वाहताना दिसत होते तर आज रविवार असल्यामुळे बाजारात मल विक्री साठी आलेले दुकानदारांची धावपळ उडाली
कांद्याचे डोंगळे पावसाने भिजल्याने नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे या पावसामुळे शेतकरी हावलदील झाले आहे काही ठिकाणी द्राक्षे चे बागेत पणीसाचल्या मुळे शेतकरी हावलदिल झाले आहे. रविवारी दिवसभर कड्क उन्ह होता चार पाच वाजता ढगाळ वातावरण झाले होते
तसेच नाशिक जिल्ह्यातील काही ठिकाणी गारपीट च्या तडाखे ने मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. आता पाहिले पंचनामे संपले नाहीतर परत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
पावसा मुळे बळीराजाचा आर्थिक गणित बिगडले आहे.
यात कधी अवकाळी पाऊस,तर कधी गारपीट,वादळी वाऱ्यासह पाऊस अनेक संकटात शेतकरी सापडलेला आहे.
नुकसानीने शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून घेतला आहे.
ब्राम्हणगांव विंचूर येथील शेतकरी सुनील गवळी
रविवार रात्री ८|१५ वाजता पंधरा ते वीस मिनिट,आलेला बेमोसमी पावसामुळे शेतीमालाचे प्रचंड नुकसान होणार आहेत. उन्हाळ कांदे काढणीस सुरवात झालेली आहे,गहू सोंगनीस आलेला आहे. उन्हाळ कांदे चे व लाल कांदे यांचे डोंगळे, आणि अंतिम टप्प्यात असलेला द्राक्षे यांना मोठा फटका बसणार आहे. या बेमोसमी पावसामुळे शेतकर्याची एकच धावपळ उडाली गहू झाकायचे की कांदे झाकायचे
जनु काही हे नुकसान शेतकऱ्याच्या पाचीलाच पुजलेले आहे.