ताज्या घडामोडी
वखार आपल्या दारी”कार्यक्रमातून शेतकरी जनजागृती अभियान राबविणार — साठा अधिक्षक, लासलगांव
प्रतिनिधी श्री. ज्ञानेश्वर भवर

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, लासलगांव केंद्र अंतर्गत शासनामार्फत “वखार आपल्या दारी” कार्यक्रमाद्वारे शेतकरी/शेतकरी उत्पादक संस्था यांचे करिता अन्न-धान्य साठवणुक, वखार पावती तारण योजना तसेच गोदाम सुविधांबाबत माहिती व जनजागृती कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या विषयी मार्गदर्शन करण्यासाठी कृषी व पणन विभागाशी संलग्न असलेले अधिकारी उपस्थित असणार आहेत. कार्यक्रम लासलगांव परिसरातील वेळापुर दि. ०८.११.२०२३, उगाव दि.२१.११.२०२३, कोळगाव दि.२९.११.२०२३ व वाहेगाव(भरवस) दि.०५.१२.२०२३ रोजी या सर्व गावात सकाळी ९.०० वाजता घेण्यात येणार आहे. तरी परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन श्री.भूषण पाटील,साठा अधिक्षक, म.रा.वखार महामंडळ,लासलगांव यांनी केले आहे.