माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ यांच्या स्थानिक आमदार निधीतून अग्निशामक वाहनास ९० लाखाचा निधी मंजूर…
सोमनाथ मानकर

लासलगाव गेल्या कित्येक वर्षांपासून लासलगाव येथे अग्निशामक गाडीची अत्यंत गरज होती..मागच्या वर्षभरात सातत्याने भर वस्तीत,दुकानांमध्ये शॉर्ट सर्किटने व् इतर कारणाने आग लागण्याच्या घटना घडल्या.प्रत्येक वेळी आगीमुळे १००% नुकसान होऊन आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले.त्यामुळे आर्थिक,मानसिक त्रास लोकांना मोठ्या प्रमाणावर झाला.म्हणूचच लासलगाव पंचक्रोशीतून नागरिकांनी अग्निशामक गाडीची मागणी केली होती.
निवडणुकीच्या वेळी लासलगाव येथे सभा असताना त्यावेळी सुवर्णा जगताप आणि शेखर होळकर यांनी जाहीर सभेत भुजबळ साहेबांकडे अग्निशामक गाडीची मागणी करून लासलगाव करांना त्रासातून मुक्त करण्याचे आवाहन केले.साहेबांनी त्याच सभेत उत्तर देताना निवडणूक झाल्यावर लगेचच अग्निशामक गाडीसाठी निधी देण्याचे आश्वासन दिले..त्याप्रमाणे लगेचच आमदार भुजबळ साहेबांच्या निधीतून ४५ लाख रुपये आणि आमदार पंकज भुजबळ यांच्या निधीतून ४५ लाख रुपये असे एकूण ९० लाख रुपये मंजूर करून लासलगाव साठी आनंदाची बातमी दिली.
याकामी निधी मंजूर केल्याबद्दल माजी आमदार कल्याणबापू पाटील,मा जी प सदस्य डी के नाना जगताप,राष्ट्रवादी सरचिटणीस बबन शिंदे,डॉ श्रीकांत आवारे,कृ ऊ बा मा सभापती सुवर्णा जगताप, लासलगाव चे प्रभारी सरपंच रामनाथ शेजवळ, शेखर होळकर ,मंगेश गवळी,राजेंद्र चाफेकर,बालेश जाधव,
यांनी लासलगाव पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना तर्फे आभार मानले
निवडणूक झाल्यानंतर भुजबळ साहेब मोठ्या मताधिक्याने निवडून आल्यानंतर साहेबांनी जो शब्द दिला होता तो पाळला..सातत्याने पाठपुरावा करून हा विषय मार्गी लावल्याबद्दल माजी उपमुख्य मंत्री छगनरावजी भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ यांचे मी मनापासून आभार मानतो..लवकरच लासलगावचे बाकीचे प्रलंबित प्रश्नही लवकरच सोडवतील अशी खात्री देतो.
डि के नाना जगताप