रुई या ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय यांच्यावतीने कलावंत सोहळा संपन्न

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय रुई विद्यालय वार्षिक स्नेहसंमेलन कलावंत व कलाकार सोहळा विद्यालयाचे प्राचार्य श्री तेलोरी जी एन व शिक्षक कर्मचारी यांनी स्नेहसंमेलन घडून आणले कार्यक्रमाचे उद्घाटन डी .वाय .एस .पी. निफाड मा श्री निलेश जी पावले व ह .भ. प. श्री. ज्ञानेश्वर माऊली शिंदे राम कृष्ण हरी साधना आश्रम रुई यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अमृता पवार. सुजित गुंजाळ. जयदत्त होळकर. प्रवीण कदम. गायकवाड व्ही.एन.श्रीकांत आवारे सौ सोनिया होळकर. व अनेक मान्यवर व गावातील ग्रामस्थ व पंचक्रोशीतील मुले उपस्थित होते
उपस्थित पाहुण्यांचा सत्कार गावातील ज्ञानेश्वर तासकर शिवाजी रोटे कोंडाजी गायकवाड त्रंबक चव्हाणके पृथ्वीराज भदाणे सौ ऋषिकला घोटेकर निलेशजी रोटे जगन्नाथ तासकर सरपंच सौ सरला पवार पोलीस पाटील योगेश झुरळे उपसरपंच सौ स्वाती तासकर चेअरमन राजाराम कोकाटे या सर्व मान्यवरांनी पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर गणरायाला वंदन करून नृत्य व कलाविष्कार या कार्यक्रमास सुरुवात झाली या कार्यक्रमांमध्ये देशावरील देश मेरा रंगीला तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्यावरती नाच गाणे करण्यात आले तसेच अनेक मुलांच्या वतीने वेगवेगळ्या कला सादर करण्यात आल्या यावेळी ती पंचक्रोशीतील पालक व मुले तसेच मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते