
नाशिक खाजगी मालमत्तेवर वसुलीची नोटीस पाठवणे साहजिक आहे, परंतु चक्क विमानतळालाच नोटीस बजावण्यात आली आहे. राज्यातील शिर्डी विमानतळावर जप्तीची नोटीस लावण्यात आली आहे .या विमानतळावर जप्तीची नोटीस लावल्यामुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त होत आहे. या विमानतळाला काकडी ग्रामपंचायत कडून साडेआठ कोटी रुपये थकबाकी असल्याकारणाने काकडी ग्रामपंचायतीने याआधी वेळोवेळी त्यांना नोटिसा देऊन सुद्धा त्यांनी थकबाकी भरली नसल्याने काकडी ग्रामपंचायतिने आमदार, खासदार, मंत्र्यापर्यंत थकबाकी वसुलीसाठी पाठपुरावा केला होता, परंतु शिर्डी विमानतळाने त्यांच्या नोटीसीचा विचार न करता थकबाकी दिली नसल्याने शिर्डी विमानतळाला काकडी ग्रामपंचायती कडून थेट जप्तीची नोटीस बजावली आहे .अशा पद्धतीने विमानतळाला नोटीस देण्यात आल्याने सगळीकडे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.