दिनांक ११ ऑगस्ट २०२४ रोजी भारतातील एकमेव श्री वडसिद्ध नागनाथ मंदिरावर १०८ कलश स्थापना
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव– नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील विटावे गंगावे येथे प्रकाश दादा कोल्हे सर यांच्या संकल्पनेतून व गावकऱ्यांच्या सहकार्याने
श्री क्षेत्र वडसिंगनाथ नागनाथ मंदिर विटावे गंगावे,ता.चांदवड येथे भारतातील एकमेव असे श्री वडसिद्ध नागनाथ मंदिरावर 108 कलशारोहन सोहळा श्री बाबाजींच्या व इतर संतांच्या च्या शुभ हस्ते संपन्न झाला.
त्याप्रसंगी मोठ्या प्रमाणात हरिद्वार काशी त्रंबकेश्वर व इतर ठिकाणचे कुंभमेळा साधुसंतांचे हस्ते कलश पूजन होऊन सात दिवस महा यज्ञ सोहळा संपन्न झाला. विटावे गंगावे येथील पावन भूमीमध्ये 151 फुटाचा जगातील सर्वात उंच त्रिशूलची कुंभमेळ्याच्या वेळी स्थापना होणार आहे, असे प्रकाश दादा कोल्हे यांनी कार्यक्रमात सांगितले. श्री वड सिद्ध नागनाथाचे लाखोच्या संख्येने भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.