सप्तशृंगी गडावरील महाराष्ट्र सुरक्षा बल यांची दादागिरी थांबणार कधी भाविकांमध्ये व सुरक्षा सुरक्षकांमध्ये कायम होतात भांडणे
संपादक सोमनाथ मानकर

सप्तशृंगी गड-
साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगी गड या ठिकाणी सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट यांच्यावतीने महाराष्ट्र सुरक्षा बल यातील काही लोक मंदिर परिसरामध्ये कार्यन्वित केलेले आहे परंतु या लोकांची दिवसान दिवस दादागिरी इतकी वाढलेली आहे की त्यांना प्रसार माध्यम तील लोक असेल किंवा भाविक यांच्यातील फरक सुद्धा लक्षात येत नाही त्यामुळे त्यांची दादागिरीमुळे भाविकांना अक्षरशा संताप व्यक्त करावा लागत आहे यामुळे कायम भाविकांची आणि महाराष्ट्र सुरक्षा बल याची भांडणे मंदिराच्या परिसरात होतच असतात आणि रोज कुठल्या ना कुठला अर्ज सप्तशृंगी निवासन देवी ट्रस्टमध्ये जमा होत असतो परंतु सप्तशृंगी निवासनी देवी ट्रस्ट सुद्धा यांच्यावर कारवाई का करत नाही असा प्रश्न आता भाविकांना निर्माण झालेला आहे .
या लोकांमुळे काही दिवसापूर्वी सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांनी एकत्र येत दोन दिवसासाठी सप्तशृंगी गड बंद केलेला होता की एजन्सीतील कुठले लोक मंदिराच्या परिसरात किंवा गडावरती नको कारण हे दादागिरी ची भाषा वापरतात त्यावेळेस सुद्धा सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट व विश्वास्त असेल किंवा प्रशासन यांनी कुठलाही कारवाई न करता धातुर्मातुर प्रश्नाला उत्तर देऊन वरील ग्रामस्थांचा राग शांत केला परंतु आता सुद्धा दाभाडी येथील भाविकांनी आपला राग व्यक्त करत सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टला एक अर्ज केलेला आहे की या अर्जामध्ये असे नमूद आहे की एक महिला आपल्या बाळाला दूध पाजत असताना सुद्धा सुरक्षारक्षकांनी त्यांना त्या ठिकाणी उठून बाहेर हाकलुन दिले व आरे रावी ची भाषा वापरली एक भाविक त्यांना रोखण्यासाठी गेला तर त्याला सुद्धा अतिशय चुकीची भाषा वापरली हे किती दिवस चालणार असा , प्रश्न? आता भाविकांना पडलेला आहे . सप्तशृंगी निवासीनी देवी ट्रस्ट किती दिवस बघ्याची भूमिका घेणार असा प्रश्न आता उपस्थित राहिला आहे