अनंत विभूषित श्री जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान आयोजित भव्य रक्तदान शिबिर संपन्न
ज्ञानेश्वर पोटे

लासलगाव-दिनांक १०/०२/२०२४ रोजी ग्रामीण रुग्णालय येथे श्री अनंत विभूषित रामानंदाचार्यजी श्री जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज दक्षिण पीठ नानिजधाम यांनी आयोजित केलेले व निफाड तालुका सेवाभावी समिती ने संयोजित केलेले लासलगांव तालुका निफाड येथील ग्रामीण रुग्णालयातील भव्य रक्तदान शिबिर निफाड तालुका अध्यक्ष श्री गोपीनाथ जाधव,श्री भाऊसाहेब काळे,गोरखभाऊ काळे,कल्पेश जाधव,सोमनाथ काळे,रंगनाथ दरेकर,सोमनाथ आहेर,निवृत्ती आहेर,सुनील शिंदे,सुरेश केंदळे त्याचप्रमाणे महिलांमधील संयोजिका वैशूताई ढगे,कांबळे ताई,दीक्षाताई काळे या सर्वांनी योग्य नियोजन करून रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडले.सर्व रक्तदात्यांचे सन्मानपत्र देऊन आदरातिथ्य केले.निफाड तालुका सेवाभावी समितीने योग्य ते नियोजन करून जवळपास ५९ रक्तदात्यांकडून रक्तदान करवून घेतले.रक्तदानाच्या वेळेस रक्तदात्यांना चहा,बिस्किट,केळी,हरभरा मिसळ आदि अल्पहार देण्यात आला.