ताज्या घडामोडी

सादरी गावात शिक्षण विभागाचे दुर्लक्ष ? विद्यार्थी कसे बसे शिक्षण घेते आहे

कळवण प्रतिनिधी वैभव गायकवाड

धडगांव तालुक्यातील तोरणमाळ परिसर म्हणून ओळख असलेले अतिदुर्गम आदिवासी भागात सादरी हे गाव आहे. सादरी हे गाव उडद्या ग्रामपंचायत अंतर्गत येत असून या गावाच्या काही भाग नर्मदा नदीच्या बुडित क्षेञात येतो व उवर्रित जागेवर ७० ते ८० कुटुंबाची वस्ती आहे. या गावांपर्यंत जायला व गावात पक्का रस्ता नाही.

सादरी या गावात मध्यप्रदेश मधील रेवामैया शैक्षणिक संस्था हि ४० विद्यार्थ्यांना शिक्षण देत ,तर यंग फाॅंऊडेशन संस्था धुळे जि.धुळे हि ४० ते ४५ विद्यार्थ्यांना शिक्षण देते. हे वर्ग फक्त इयत्ता १ ली ते २ री पर्यंत चालते. हि शाळा सादरी गावातील एक सामाजिक कार्यक्रर्ते गुडा पावरा यांच्या घराजवळ एका पडित कुडाच्या घरात शाळा भरते. व या शाळेतील शिक्षक हे गिलदार सरदार पावरा व भुवानसिंग भरमसिंग पावरा ह्या दोघ शिक्षकांना कमी मानधनावर विद्यार्थ्यांना शिक्षण देत असतात.या शाळेतील विद्यार्थ्यांना २ वर्ष पुर्ण झाल्यानंतर पुढिल शिक्षणसाठी रामभरसे अशी अवस्था दिसून येते. नंदुरबार सारख्या आदिवासी गाव पाड्या पर्यंन्त डिजिटल शिक्षण पध्दत सूरू होवून सुद्धा डोंगराळ अतिदुर्गम सादरी सारख्या गावकडे जिल्हा परिषद नंदुरबार येथील शिक्षण विभाग लक्ष देत नसेल तर दुदैवी बाब दिसून येते. नंदुरबार जिल्हातील धडगांव व अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदा किनारी ३२ ते ३५ गावातील ग्रामस्थांची काय हालअपेष्टा असेल. शासनाला सादरी ग्रामस्थांची एकच विनंती आहे की, विद्यार्थ्यांना पक्की शाळा बांधण्यात यावी व येणारी भावी पिढीला तरी चांगले शिक्षण घेईल

 

 किसन पावरा महिला आर्थिक विकास महामंडळ नंदुरबार तथा पञकार, डेबरा पावरा,भुवानसिंग पावरा, सामा पावरा, रामज्या पावरा, शिलदार पावरा, वकल्या शिवला पावरा, ऐमना पावरा, भांगा पावरा, गणेश जोरदार पावरा, काव्या पावरा, थिक्या पावरा, सोबा पावरा आदी ग्रामस्थ शाळा पाहणी केली 

 

 

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.