
सिन्नर तालुक्यातील माळेगाव -सिन्नर या औद्योगिक वसाहतीचा विस्तार करण्यासाठी शेजारच्या मापारवाडी शिवारातील 204 एकर जमिनीचे संपादन करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून यासाठी एकरी 52 लाख रुपये दर जाहीर करण्यात आला आहे. जमीन धारकांना त्यांचा मोबदला दिल्यानंतर उर्वरित भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यामुळे माळेगाव सिन्नर – औद्योगिक वसाहती मधील जागेची टंचाई दूर होऊन नवीन उद्योग येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ही भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर माळेगाव – सिन्नर ही 22 हजार एकर वर वसलेली नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत होणार आहे.