दुष्काळी अनुदानासाठी 11 मार्च पर्यंत कागदपत्रे जमा करा सिन्नर तहसीलदाराचे आवाहन.
सिन्नर प्रतिनिधी

सिन्नर तालुक्यांना खरीप हंगाम 2023 साठी 75 कोटी 81 लाख रुपयाचे अनुदान मिळाले आहे. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी अद्याप कागदपत्र जमा केले नाहीत त्यांनी तातडीने 11 मार्च पर्यंत आपली कागदपत्र संबंधित तलाठी कार्यालयात जमा करावे असे आव्हान तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी केले आहे. सिन्नर तालुक्यात 2023 च्या खरीप हंगामात राज्य शासनाच्या महसूल विभागाने दुष्काळ घोषित केला आहे. त्यामध्ये बाधित झालेल्या 85 हजार 865 शेतकऱ्यांना 75 कोटी 81 लाखाचा निधी शासनाकडून आलेला आहे. अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शासनाच्या नियमानुसार थेट वितरित करण्याची कार्यवाही सिन्नर तहसील कार्यालयाकडून सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप गावच्या तलाठ्याकडे आधार कार्ड ,पासबुक झेरॉक्स जमा नाही त्यांनी लवकरात लवकर जमा करावी व सामायिक खाते असणाऱ्या शेतकऱ्यांनी ज्या बँकेत अनुदान जमा करायचे आहे त्या बाबतचे संमती पत्र सोबत जोडणे आवश्यक आहे संमती पत्र मंडळाधिकाऱ्याच्या समक्ष स्वाक्षरी करून जमा करावे.