विंचूर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात दत्त जयंती कार्यक्रम उत्साहात संपन्न.
सुनील क्षिरसागर

अखिल भारतीय श्री गुरुपीठ त्रंबकेश्वर चे पीठाधीश श्री गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आज्ञेने व आशीर्वादाने निफाड तालुक्यातील विंचूर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दत्त जयंती निमित्त आठ दिवसाच्या या पर्वकालात यज्ञयाग, अखंड प्रहरा, श्री गुरुचरित्र पारायण, श्री स्वामी चरित्र वाचन, श्री नवनाथ चरित्र वाचन व महाराजांचा अशा विविध भरगच्च कार्यक्रमांनी संपन्न झाला.
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील पूर्ण वर्षातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे दत्त जयंती. दत्त जयंती म्हणजे माता अनुसयांनी आपल्या सामर्थ्यावर स्वर्गीय देवांचे बालके केले. आणि दत्त महाराजांचा जन्म झाला म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून अगदी भक्ती भावाने उत्साहाने सर्वच दत्त मंदिरांमध्ये साजरा केला जातो.
या सप्ताह काळात २४ तास, दिवसा महिला व रात्री पुरुषांकडून अखंड प्रहरा सेवा चालू होती. सकाळी आठच्या भुपाळी आरतीपासून सामुदायिक गुरुचरित्र पारायण वाचन, श्रीमद् भागवत पारायण वाचन, श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र वाचन, श्री नवनाथ चरित्र वाचन, श्री दुर्गा सप्तशती चरित्र वाचन, अजून या सप्ताहाकाळात भाविकांमध्ये बालकांनी सुद्धा सहभाग घेऊन श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा जप केला. तसेच यासात दिवसाच्या पर्व काळात
यज्ञयागांमध्ये श्री गणेश याग, श्री चंडीयाग, श्री गीतायाग श्री रुद्र व श्री मल्हारी याग, श्री दत्त याग संपन्न झाला. या दत्त जयंतीच्या शेवटच्या दिवशी सोडोपचारे अभिषेक, नित्यस्व:कार व पूर्णाआहुती कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या हितगुजामध्ये विनायक महाले (शास्त्री) सांगतांना दत्त प्रणाली बद्दल दत्त महाराजांची संपूर्ण माहिती आणि आयुर्वेदाबद्दल माहिती दिली. त्यामध्ये सप्तरंगी काढा ही औषधी सर्वच आजारांवर अत्यंत उपयोगी आहे. आयुर्वेद सर्वच औषधांमध्ये या बहुगुणी औषधीचा एक नंबर आला आहे. म्हणून केंद्रीय अन्न व औषधी विभागाकडून कडून विशेष प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तसेच केंद्रीय विशेष पथकाने त्रंबकेश्वर श्री स्वामी समर्थ गुरुपीठ येथील अन्नछत्राची पाहणी करून स्वच्छता व इतर बाबी तपासून विशेष प्रशस्तीपत्र देऊन गुरुपीठास गौरविण्यात करण्यात आले आहे.