जुळ्या बहिणींशी विवाह करणारा तरुण अडचणीत? राज्य महिला आयोगाने दिले पोलिसांना महत्वाचे निर्देश
नवी मुंबई प्रतिनिधी

सोलापूर – जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी लग्न केल्याची आगळी-वेगळी कहाणी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे घडली होती.
हा विवाह करनं नवरदेवाच्या चांगलच महागात पडलं आहे. नवर देवाविरोधात याप्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर आता या प्रकरणात राज्य महिला आयोगाची एंट्री झाली आहे. सोशल मीडियावर हे प्रकरण प्रचंड गाजत असताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलीस अधिकाऱ्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत.
या प्रकरणी नवरदेवा विरोधात अकलूज पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता १८६० च्या ४९४ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माळेवाडी येथील राहुल फुले यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केल्याचे समजते.
रिंकी आणि पिंकी असे जुळ्या बहिणींची नावे असून अतुल असे नवरदेवाचे नाव आहे.
तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील याबाबत एक ट्विट केले आहे.
आपल्या ट्विटमध्ये रुपाली चाकणकर म्हणतात,
”सोलापूर येथील एका तरुणाने मुंबईतील जुळ्या बहिणींशी एकाच मांडवात लग्न केले आहे. ह्या लग्नाची सोशल मीडियातून सर्वत्र चर्चा सुरू आहे.
तसेच माध्यमातून ह्या लग्नाच्या बातम्या सुरु आहेत.
भारतीय दंड संहितेच्या कलम 494 प्रमाणे हा गुन्हा आहे.
तरी सोलापुर पोलिस अधिक्षक यांनी उपरोक्त बाबत चौकशी करून त्वरीत कायदेशीर कारवाई करावी.
तसेच केलेल्या कारवाई बाबतचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम १९९३ चे कलम १२ (१) व १२ (२) अन्वये तात्काळ सादर करावा आसे म्हटले आहे.
काय आहे नेमकं प्रकरण
रिंकी आणि पिंकी असे जुळ्या बहिणींची नावे असून अतुल असे नवरदेवाचे नाव आहे.
शुक्रवारी (२ डिसेंबर) अकलूज-वेळापूर रोडवरील गलांडे हाॅटेल येथे हा विवाह सोहळा पार पडला होता.
अतुल माळशिरस तालुक्यातील आहे.
त्याचा मुंबई येथे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे.
उच्चशिक्षित पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणी कांदिवली मधील आहेत.
सहा महिन्यांपूर्वी पिंकी, रिंकी आणि त्यांची आई आजारी पडल्या होत्या.
त्यानंतर अतुलने त्यांना रुग्णालयात दाखल करून त्यांची काळजी घेतली.
यातूनच त्यांचे प्रेम जुळले आणि नातेवाईकांच्या संमतीने हा विवाह पार पडला.
या विवाहाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु असल्याचे पाहायला मिळाले.