लासलगाव महाविद्यालयात साने गुरुजी यांची 123 वी जयंती उत्साहात साजरी
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव:- दिनांक २४ डिसेंबर राष्ट्रसंत साने गुरुजी यांची १२३वी जयंती येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय लासलगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने साजरी करण्यात आली.
‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ हि प्रार्थना ज्यांनी जगाला अर्पण केली असे मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखक, आदर्श शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता व स्वातंत्र्यसैनिक परमपूजनीय पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी पर्यवेक्षक श्री उज्वल शेलार सर, श्री किशोर गोसावी सर, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी देवेंद्र भांडे आणि सुनील गायकर तसेच सर्व प्राध्यापक वर्ग आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, प्राचार्य डॉ.दिनेश नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कार्यक्रम यशस्वीेतेसाठी रा.से.यो.कार्यक्रमाधिकारी श्री देवेंद्र भांडे, श्री सुनील गायकर आणि सर्व स्वयंसेवक यांनी प्रयत्न केले.