
नाशिक – रेल्वे स्थानकामध्ये प्रवाश्या सोबत ओळख करून त्यांना गुंगेचे औषध देऊन त्यांची लुटमार करणाऱ्या चोरट्यास रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांनी मोठ्या सीताफिने अटक केली आहे . बुद्धी सागर कुशियाल( वय 20 रा. माळेगाव, सिन्नर )हा तरुण सतना ( मध्य प्रदेश ) येथे जाण्यासाठी नाशिकरोड रेल्वे स्थानक येथे तिकीट काढण्यासाठी आला होता. त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज नगर येथील मेहबूब चांद शेख ( 48 )याने त्याच्यासोबत मैत्री करीत चहा घेण्याचा आग्रह केला .चहा घेतल्यानंतर त्याने स्वतः जवळील गुंगीचे औषध टाकून आणलेले क्रीमचे बिस्कीट खाऊ घातले. व प्लॉट क्रमांक एकवर आणून बसवले, थोड्यावेळाने बुद्धीसागर यास गुंगी आल्यानंतर संशयित मेहबूब याने त्याच्याजवळ असलेले 1550 रुपये, पाकीट, आधार कार्ड, पॅन कार्ड ,व मोबाईल असे एकूण 19 हजार 550 रुपये किमतीचा एवस लुटून पोबारा केला. बुद्धीसागर बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने त्यास पोलिसांनी बिटको रुग्णालयात दाखल केले .त्याला शुद्ध आल्यावर त्याने अज्ञात व्यक्तीच्या विरोधात लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली . त्यानंतर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी. रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक हरफुल सिंग यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक अहिरे , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष उपाडे पाटील, दीपक निकम ,शैलेंद्र पाटील ,रेल्वे सुरक्षा बलाचे दिनेश यादव, मनीष कुमार, निर्मला सूर्यवंशी ,आदींनी गुप्त माहितीच्या आधारे संयुक्त कारवाई करीत चोरी केलेल्या रोख रक्कम व योगासह महबूब शेख यास अटक केली.