चांदवड तालुक्यातील कुंदलगाव येथे महसूल खात्यातील तलाठी यांच्यावर यशस्वी सापळा कारवाई
ज्ञानेश्वर पोटे

चांदवड तालुक्यातील कुंदलगाव येथील तलाठी श्री विजय राजेंद्र जाधव वय 33 वर्ष पद – तलाठी सजा शिंगवे अतिरिक्त कार्यभार कुंदलगाव ता .चांदवड जि .नाशिक सध्या राहणारे श्रम साफल्य कॉलनी ,प्लॉट नंबर 11,वडेल रोड ,वलवाडी ,देवपूर धुळे. यांनी तक्रारदार यांच्या आई ,मामा तसेच मामांच्या मुली व मावशी यांनी कुंदलगाव ता .चांदवड येथील शेती वाटपासाठी निफाड दिवाणी कोर्टात दावा दाखल केला होता,कोर्टात त्यांचा समझोता होऊन कोर्टाच्या आदेशानुसार कुंदलगांव ता.चांदवड येथील गट नंबर 410,412,414 या गटातील 50-50 गुंठे जमीनीवर तक्रारदाराच्या आई तसेच त्यांचे मामा व इतर नातेवाईक यांच्या नावांची सातबाऱ्याला फेरफार नोंद घेण्यासाठी व इतर महसूल रेकॉर्डवर नावे लावण्यासाठी तहसीलदार चांदवड यांचे कडे अर्ज केला होता तो अर्ज पुढील कार्यवाही साठी मंडल अधिकारी यांचे मार्फत यातील आलोसे यांच्या कडे देण्यात आला होता.या कामासाठी यातील आलोसे यांनी तक्रारदाराकडे पंचांसमक्ष 15000/- रुपये लाचेची मागणी करून ती प्रत्यक्ष 10000/- रुपये स्वीकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे .आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी
मा .जिल्हाधिकारी नाशिक,
सापळा अधिकारी
विश्वजीत पांडुरंग जाधव, पोलीस उपअधिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
मो.न. 9823388829
सापळा पथक- पो.ह.प्रणय इंगळे,
पो.कॉ.अनिल गांगुर्डे,चालक पो.ह.विनोद पवार सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक.
मार्गदर्शक –
मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर,
पोलीस अधीक्षक, ला.प्र.विभाग नाशिक परीक्षेत्र,नाशिक
मो.न. 9371957391
मा .श्री माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक,
ला.प्र.विभाग नाशिक परिक्षेत्र नाशिक.
मो नं 9404333049
सहकार्य श्री नरेंद्र पवार पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.विभाग नाशिक.
मो.न. 9822627288.
याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा.
दुरध्वनी क्रमांक-
02532578230
टोल फ्री क्रमांक १०६४