भाटगांव तालुका चांदवड येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी चंपाषष्टी निमित्त खंडेराव महाराज यात्रा मोठ्या उत्साहात साजरी
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव – चांदवड तालुक्यातील भाटगांव येथे चंपाषष्ठी निमित्त ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यात्रा कालावधीत सहा दिवस वेगवेगळ्या ठिकाणच्या वाघे मंडळींनी दररोज रात्री खंडोबाचे जागरण गोंधळ कार्यक्रम पार पाडून चंपाषष्ठीच्या दिवशी दुपारी ४ ते ६ काठी मिरवणूक, ६ ते ७ महाआरती, ७ ते ९ महाप्रसाद होऊन रात्री १० ते ६ रहाडी आणि लंगरी जागरणाचा कार्यक्रम होऊन खंडेराव महाराज यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली.
समस्त ग्रामस्थ आणि जय मल्हार वाघे मंडळ भाटगांव यांच्या संयुक्त आयोजनाने आणि पुजारी श्री.बाबाजीभाऊ गांगुर्डे (सोग्रस) यांच्या नियोजनबद्ध पद्धतीने पहिल्या दिवशी वार सोमवार दिनांक 02/12/2024 रात्री जय मल्हार वाघे मंडळ,दिघवद (चांदवड), मंगळवार दिनांक 03/12/2024 रात्री म्हाळसाकांत वाघे मंडळ,वडांगळी(सिन्नर), बुधवार दिनांक 04/12/2024 रात्री बानाई वाघे मंडळ, इगतपुरी (नाशिक), गुरुवार दिनांक 05/12/2024 रात्री खंडेराव महाराज वाघे मंडळ,मरळगोई (निफाड), शुक्रवार दिनांक 06/12/2024 रात्री मल्हारी मार्तंड वाघे मंडळ,नगरसुल(येवला) यांचा जागरण गोंधळ कार्यक्रम होऊन, शनिवार दिनांक 07/12/2024 चंपाषष्ठीच्या रात्री, मणी मल्हार वाघे मंडळ,दिक्षी (ओझर नाशिक) यांचा रहाडी आणि लंगरी जागरणाचा कार्यक्रम झाला.
या कार्यक्रम प्रसंगी सर्व ग्रामस्थ, नवतरुण मित्र मंडळ आणि वाघे मंडळींनी उत्कृष्ट आयोजन नियोजन करुन यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली.