पंजाबराव डख थेट ग्रामीण भागातील लखानी येथे शेतकरी मेळावा व चर्चा सत्र मोठ्या उत्साहात.
वैभव गायकवाड

पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना मोलाचे असे मार्गदर्शन केले व शेतकऱ्यांचे उत्स्फूर्त प्रतिसाद
कळवण तालुक्यातील लखानी येथे दि 26/11/2024 रोजी समग्र ग्रामीण विकास कार्यक्रम HDFC बँक व संजीवनी संस्था यांच्या मार्गदर्शनाने शेतकरी मेळावा व चर्चा सत्र लखानी येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पंजाबराव डख हवामान अभ्यासक हे उपस्थित होते यावेळी पंजाबराव डख यांचे व उपस्थित मान्यवर यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार देखील करण्यात आले होते.
यावेळी पंजाबराव डख यांनी उपस्थित असलेल्या सर्व शेतकरी वर्गाला हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी उपस्थित शेतकरी वर्गाला सांगितले की हवामानाचे अंदाज कसे ओळखायचे व आपल्या शेतातील पिकाचे उत्पन्न कसे वाढेल व आपल्या शेतातील पिके पावसाच्या आत कसे आवरून घ्यायचे व शेतकऱ्याला पिकाचा कसा फायदा होईल असे पंजाबराव डख यांनी मोलाचे असे मार्गदर्शन केले व यापुढेही हवामानाचे व पावसाचा अंदाज कसे राहील हे देखील मी तुम्हाला यापुढेही वेळोवेळी मार्गदर्शन करत राहील असे आपल्या मार्गदर्शनातून शेतकऱ्यांना सांगण्यात आले यावेळी समग्र ग्रामीण विकास कार्यक्रम HDFC बँक व संजीवनी संस्थेचे संस्था सहाय्यक संचालक नामदेव नागरे व प्रकल्प प्रमुख आर पी ठाकरे, तांत्रिक अधिकारी यशवंत कडाळी, अँग्री अधिकारी कुमार शिंगाडे, यासह परिसरातील सोसायटी चेअरमन, व्हाय चेअरमन व ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच सदस्य, पोलीस पाटील व संजीवनी संस्थेचे गाव समिती व संजीवनी संस्थेचे अधिकारी व पदाधिकारी, परिसरातील ज्येष्ठ नागरिक, शेतकरी वर्ग व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते