
कळवण – तालुक्यातील आदिवासी भागात डोंगऱ्या देवाच्या उत्सवाला श्रद्धने प्रारंभ झाला आहें. डोंगऱ्या देव उत्सव मध्ये विविध प्रकारचे आदिवासी लोकगीते सादर केले जातात. घुंगरू बांबूचे पावरी वाद्य आणि सोबत टाळ्याचा आवाज आणि त्यांच्या जोडीला शे द्रुव व शे हो असा आवाज सध्या आदिवासी भागातील रानावनात डोंगरदर्यात घुमत आहे.
आदिवासी भागात आदिवासी बांधवांची मोठे श्रद्धा असलेल्या डोंगर देवाची जोरदार सुरुवात तताणी गावातमध्ये बघायला मिळत आहे.
संपूर्ण गावामध्ये माऊल्याचा आठ ते दहा दिवस उपवास पाळला जातो. माया धरती पासून तर सूर्यापर्यंत आदिवासी भाषेत डोंगर देवाची गीते पावरीच्या सुर मधुर आवाजात म्हटले जातात. ही गीते कानावर पडतात आदिवासी बांधवांचे जीवनच बदलून जाते. डोंगऱ्या देवाचे कार्यक्रम पाण्यासाठी दुरून आदिवासी बांधव मोठ्या संख्येने येतात. आदिवासी बांधवांचे निसर्गाशी घट्ट नाते आहे त्याच निसर्गावर अपार सरदार असल्याने जंगलातील पशुपक्षी वाघ देव नागदेव मोर सूर्य चंद्र हेच त्यांचे दैवत असल्याने त्यांची मनोभावनेने पूजा आदिवासी बांधव करतात. पाच वर्षांनी डोंगऱ्या देवाची पूजा करतात.