लासलगाव महाविद्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा व स्कूल कनेक्ट २.०’ अभियानाचे आयोजन
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव दि. ८ नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने *’वाचन संकल्प महाराष्ट्राचा व स्कूल कनेक्ट २.०’* अभियानाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे उपस्थित होते तर या अभियानांतर्गत वाचन संकल्प महाराष्ट्राचा व स्कूल कनेक्ट या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून गणित विभागप्रमुख डॉ.विलास खैरनार आणि मानसशास्त्र विभागाचे प्रा.किशोर अंकुळणेकर यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले तसेच याप्रसंगी उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक श्री.उज्वल शेलार, श्री.किशोर गोसावी, सरस्वती शाळेचे मुख्याध्यापक श्री.महाले सर व त्यांचा स्टाफ तसेच एन.व्ही.पी.इंग्लिश मीडियम स्कूल च्या वाधवा मॅडम व त्यांचा स्टाफ आणि रा.से.यो कार्यक्रमाधिकारी डॉ.प्रदीप सोनवणे, डॉ.संजय शिंदे, डॉ.उज्वला शेळके, श्री.सुनिल गायकर, श्री.देवेंद्र भांडे, श्रीमती अश्विनी पवार इत्यादी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी सरस्वती शाळेचे विद्यार्थी, एन.व्ही.पी.इंग्लिश मीडियम स्कूल चे विद्यार्थी आणि इयत्ता ११वी व १२वी चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर व प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.