जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत जिल्हा परिषद अध्यक्ष चषक बीटस्तरीय स्पर्धचे आयजेन पिंपळे खुर्द येथे.

क्रीडा व सांस्कृतिक केंद्र स्तरीय स्पर्धेचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व आदर्श शाळा पिंपळे खुर्द येथे. बीटस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मानेवर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले व या स्पर्धेचे उदघाटन ग्रुप ग्रामपंचायत धार्डे दिगरचे सरपंच शाहू चव्हाण व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवीद्र बहिरम, जयदर बीटाचे विस्तार अधिकारी पी.पी. महाले, बंधारपाडा, जयदर केंद्राचे केंद्रप्रमुख डी.डी.पगार, पिंपळे खुर्द केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीमती अनिता बागुल मॅडम व पिंपळे खुर्द शाळेचे मुख्याध्यापक भास्कर बहिरम या सह उपस्थित असलेले सर्व मुख्याध्यापक, शिक्षक या सह मानेवर यांच्या हस्ते उदघाटन करुन स्पर्धा सुरु करण्यात आले होते. कोविडच्या पराभवानंतर होणाऱ्या या स्पर्धेचा उत्साह जोमात होता. मुलांच्या शैक्षणिक विकासा बरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावे असे विस्तार अधिकारी पी.पी. महाले यांनी प्रास्तविकेमध्ये आपले मनोगत वेक्त केले. सदर स्पर्धेमध्ये जयदर बीटातील पिंपळे खुर्द केंद्रातील व जयदरकेंद्र, बधारपाडा केंद्रातील सर्व शाळेंनी सहभाग नोंदवला या स्पर्धेमध्ये
लहान गट
वकृत्व स्पर्धा (प्रथम) राजवीर चव्हाण, २०० मी धावणे शाळा पिंपळे खु, जयेश बहिरम पिंपळे खु, १०० मी धावणे (प्रथम) हर्षदा भोये शाळा लखाणी चित्रकला स्पर्धा (प्रथम) अश्विनी चव्हाण शाळा मळगांव बु, वैयक्तिक नृत्य (प्रथम) दर्शना कामडी शाळा देवनळी सामुहिक नृत्य पिंपळे खुर्द (प्रथम) वैयक्तिक गायन यश चौधरी (प्रथम) शाळा सुळे पाडा, सामुहिक गायन पुणेगाव (प्रथम) व नव्याने समावेश झालेल्या स्पेलिंग बी या स्पर्धा प्रकारचा समावेश होता यामध्ये (प्रथम) राजवीर चव्हाण शाळा पिंपळे खुर्द व
गट मोठा
सदर यामध्ये नव्याने समावेश झालेल्या स्पेलिंग बी या स्पर्धा प्रकारचा समावेश होता यामध्ये (प्रथम)गणेश गायकवाड शाळा उंबरगव्हाण, वकृत्व स्पर्धा (प्रथम) गायत्री बहिरम शाळा पिंपळे खुर्द, चित्रकला स्पर्धा (प्रथम) प्रविण वाघ शाळा पुणेगाव, ४०० मी धावणे(मुले) युवराज बागुल (प्रथम) शाळा पुणेगाव, २०० मी धावणे (मुली) (प्रथम) देवयानी बहिरम शाळा पिंपळे खुर्द, वैयक्तिक नृत्य (प्रथम) धनश्री लोखंडे शाळा पुणेगाव, सामुहिक नृत्य (प्रथम) शाळा पिंपळे खूर्द, वैयक्तिक गायन (प्रथम) लक्ष्मी गायकवाड शाळा पुणेगाव, सामुहिक गायन (प्रथम) शाळा पिंपळे खुर्द, कबड्डी (मुले) (प्रथम) शाळा पिंपळे खुर्द, कबड्डी (मुली) (प्रथम) शाळा पिंपळे खुर्द, खो-खो (मुले) (प्रथम) शाळा पुणेगाव, खो-खो (मुली) (प्रथम) पुणेगाव या सर्व स्पर्धेतून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यावेळी जयदर बीटातील सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व यावेळी विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिल, प्याड, कंपास पेटी असे शैक्षणिक साहित्य देण्यात आले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, पालकवर्ग उपस्थित होते.
चौकटीत
या वेळी ज्या बीटस्तरीय स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेत ज्या विद्यार्थीनी घवघवित विजयी प्रथम क्रमांक मिळविले त्यांना पुढील ज्या काही आता तालुकास्तरीय स्पर्धा होतील त्या स्पर्धे साठी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शुभेच्छा देण्यात आले.
नवनिर्वाचित सरपंच – शाहू चव्हाण, मोहबारी