
आज दिनांक 01/10/2023 रोजी सकाळी 7.30 ते 10.30 या वेळेत स्वच्छता ही सेवा अभियान लासलगाव ग्रामपंचायत व थोर समाज प्रबोधनकार महाराष्ट्र भूषण डॉ.ति.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे लासलगाव येथील बैठकीतील श्री सदस्य यांच्या संयुक्त विद्यमानाने लासलगाव ग्रामपंचायत हद्दीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचा प्रारंभ प्रसंगी ग्रामपंचायत समोरील प्रांगणात राष्ट्रपिता महात्मा गांधी व थोर समाज सुधारक संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस सरपंच श्री.जयदत्त होळकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आली. यावेळी स्वच्छतेची शपथही घेण्यात आली. यावेळी गुणवंत होळकर, डॉ.विकास चांदर, ग्रामविकास अधिकारी श्री.शरद पाटील साहेब,
महाराष्ट्र भूषण डॉ.ति.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे 115 व इतर 25, ग्रामपंचायत लासलगावचे सर्व कर्मचार्यांनी सहभाग घेऊन 3 टन ओला व 5 टन सुका असा एकुण 8 टन कचरा संकलित केला. ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, रजिष्टर ऑफिस, पोलीस स्टेशन, टेलिफोन ऑफिस, बस स्थानक व मेनरोड व दशक्रिया विधी शेड परिसराची स्वच्छता करण्यात आली.