माणिक रघुनाथ मढवई माध्यमिक विद्यालय कोटमगावत बाप्पांचे विसर्जन
प्रतिनिधी . ज्ञानेश्वर भवर

माणिक रघुनाथ मढवई माध्यमिक विद्यालय कोटमगाव येथे ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. व गणपती बाप्पांची यथोचित पूजा विधी करून विसर्जन करण्यात आले.
मुख्याध्यापिका श्रीमती अनिता माणिक मढवई यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश उत्सवाचा कार्यक्रम यथोचित पार पडला. गणपती बाप्पा उत्सव समिती (विद्यार्थी मंडळ) इ.१०वी.यांनी दरदिवसाच्या कार्यक्रमाचे व सजावटीचे नियोजन केले. त्यात प्रामुख्याने कु.ओम शिरशाठ, ओंकार गायकवाड,वैष्णव शिरसाठ, यश गुरगुडे,सचिन देवरे,शिवाजी रायते, संकेत,कार्तिक गांगुर्डे तसेच कु.प्रांजल रसाळ , राजेश्वरी रसाळ,प्राप्ती गांगुर्डे,प्राची देवरे,पायल शिरसाठ,सृष्टी केंडले,गायत्री भालेराव,श्वेता पगारे, कोमल कराटे, कल्याणी सुपेकर,व इतर सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांसाठी पावभाजीचे महाप्रसाद म्ह.नियोजन करण्यात आले होते. संस्थापक अध्यक्ष माणिक रघुनाथ
मढवई सर यांनी सुरू केलेली महाप्रसादाची परंपरा यावेळी मुख्याध्यापिका मढवई मॅडम यांनी जपली. सांस्कृतिक विभाग प्रमुख
व ज्येष्ठ शिक्षक श्री गलांडे ए. पी.सर हे उत्सव समितीचे अध्यक्ष होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री गलांडे सर श्री केदारे सर, श्री गांगुर्डे सर, श्री कदम सर श्री दिवटे सर श्री देवढे डी एल.(मामा)यांनी विशेष परिश्रम घेतले.