एक तारीख एक घंटा या मोहिमेअंतर्गत चोकाक गावामध्ये राबवली स्वच्छ्ता मोहीम
प्रतिनिधी शितल कांबळे

हातकणंगले तालुक्यातील चोकाक गावामध्ये चीफ ऑफिसर संतोष पाटील यांच्या आदेशानुसार एक तारीख एक घंटा या मोहिमेअंतर्गत गावामध्ये स्वच्छ्ता मोहीम राबविण्यात आली, गावातील दसरा चौक येथे या योजनेअंर्गत एक तास श्रमदान मोहीम राबविण्यात आली स्वछतेतून समृद्धीकडे वाटचाल ह्या उपक्रमांतर्गत झाली निरोगी आणि सदृढ आयुष्याच्या प्रवासात आणखी एक उत्कृष्ट उपक्रम राबविण्यात आला नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेच हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे,ह्या उपक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांचा देखील मोठा सहभाग लाभला तसेच ग्रामपंचायत सरपंच सुनिल चोकाककर, ग्रामपंचायत सर्व सदस्य, अंगणवाडी सेविका व मदतनीस, तसेच गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक यांनी देखील आपला सहभाग उस्तुफुर्त पने दर्शवला. तसेच गावातील तरुण मंडळांचे कार्यकर्ते, समाजसेवक, पत्रकार, गावातील नागरिक यांचा देखील मोठा सहभाग लाभला या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर सरपंच सुनिल चोकाककर, उपसरपंच अरुण व्हणाळे,सदस्य हार्षदकुमार कांबळे, माजी उपसरपंच प्रवीण माळी, सदस्या सौ सविता चव्हाण, सौ रेश्मा माळगे, आंगणावडी सेविका प्रमिला ढाले, ग्रामपंचायत सदस्य राजाराम ननवरे, सेविका मदतनीस माळी मॅडम, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सदस्य पांडुरंग खाडे, उत्तम चोकाककर, माजी उपसरपंच दीपक निकम, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे बाबुराव पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी अजित शिंदे (शिपाई) , क्लार्क गीतांजली कांबळे, गायत्री कुंभार, पाणीपुरवठा विभाग भोपाल मिठारी, अजित चव्हाण ( घंटागाडी चालक) , नागरिक निवृत्ती कांबळे ( ठाना) , सुरेश कांबळे ( बँक अधिकारी निवृत्त), माजी ग्रामपंचायत सदस्या नीलाबई कांबळे, यांच्यासह अन्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.