जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटगांव तालुका चांदवड येथे “संविधान दिन” उत्साहात साजरा
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव – तालुका चांदवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटगांव येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. जाधव सर होते.
या कार्यक्रम प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. रविंद्र पोटे, अनिल पोटे, शाळेचे शिक्षक श्री. पवार सर, श्री. गवळी सर, सौ. गायकवाड मॅडम, सौ. बच्छाव मॅडम गावातील ग्रामस्थ श्री. कैलास सोमवंशी, श्री .माधव शंकर पोटे,श्री. नामदेव दामोदर मोरे, श्री. पुंडलिक आप्पा मोरे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांच्या हस्ते संविधान ग्रंथाचे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
संविधान निर्मिती, संविधानाचे मुलभूत हक्क, संविधानाचे महत्त्व, संविधानातील कलमे आणि “संविधान दिन” का आणि कशासाठी साजरा करतात, याविषयी माहिती शाळेचे मुख्याध्यापक श्री. जाधव सर यांनी सविस्तर माहिती दिली.
उपस्थित ग्रामस्थांसह विद्यार्थी आणि शिक्षकांनी संविधान प्रतिज्ञा घेतली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पवार सर यांनी केले.