ताज्या घडामोडी

भाटगांव तालुका चांदवड येथे सालाबादप्रमाणे अखंड 7 वा तुळशी विवाह मोठ्या उत्साहात साजरा

ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव – चांदवड तालुक्यातील भाटगांव येथे सालाबादप्रमाणे यंदाही 7 वा तुळशी विवाह मोठ्या उत्साहात आणि दिमाखात ह.भ.प.वैभव महाराज मोरे आणि ह.भ.प.समाधान महाराज पगार यांच्या कुशल मार्गदर्शनाने आणि भजनी मंडळ, गावातील तरुण आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने या ही वर्षी संपन्न झाला.या विवाह निमित्त भाटगांवचे ग्राम गुरू श्री.सुरेश काका कुलकर्णी यांनी यथोसांग पूजा अर्चा करून विधीवत पूजा करून श्री विष्णू आणि तुळशी मातेचा विवाह सोहळा मंगलाष्टके म्हणून पार पाडून या वेळी उपस्थित सर्व पाहूणे मंडळी आणि ग्रामस्थांना महाप्रसाद देऊन विवाह सोहळा संपन्न झाला.या वेळी ह.भ.प.समाधान महाराज पगार यांनी तुळशी विवाह निमित्त आख्यायिका सांगितली…

प्राचीन काळात जालंधर नावाचा राक्षस चहूबाजूकडे खूप उत्पाद करत होता. राक्षस वीर आणि पराक्रमी होता. त्याला साथ होती ती, त्याच्या पत्नी वृंदा हिची. पतीव्रता धर्म तिच्या प्रभावामुळे जालंधर सर्वव्यापी होता, परंतु जालंधराच्या या उपद्रवामुळे त्रस्त देवगण प्रभू श्री विष्णूंकडे आले आणि संरक्षणासाठी याचना करू लागले. त्यांची प्रार्थना ऐकून विष्णूने वृंदाचा पतीव्रता धर्म भंग करण्याचा निश्चय केला. इकडे वृंदाचे अस्तित्व नष्ट झाल्यामुळे देवतांशी युद्ध करत असताना जालंधरचा मृत्यू झाला. वृंदाला ही गोष्ट लक्षात आल्याक्षणी तिने क्रोधित होऊन प्रभू विष्णूंना शाप दिला की, ज्याप्रकारे छळ करून तुम्ही मला पती-वियोग दिला आहे, त्याचप्रमाणे तुमच्याही पत्नीचा छळपूर्वक हरण होऊन स्त्री वियोग सहन करण्यासाठी तुम्हाला मृत्यू लोकात जन्म घ्यावा लागेल. असे म्हणत वृंदा पतीसोबत सती गेली. ज्या जागेवर वृंदा सती गेली त्या जागेवर तुळशीचे झाड उत्पन्न झाले. या प्रसंगाने वृंदाने रागात श्री विष्णूंना शाप दिला की, माझे सतीत्व भंग केल्यामुळे तुम्ही दगड व्हाल.

त्या दगडाला शालिग्राम म्हणतात. तेव्हा श्री विष्णू म्हणाले की, हे वृंदा तुझ्या सतीत्वाचे फळ म्हणून तू तुळस बनवून माझ्यासोबत राहशील, माझ्यासोबत तुझा विवाह लावणाऱ्यांना पुण्य लाभेल, तेव्हापासून तुळस विना शालिग्राम किंवा श्री विष्णूंची पूजा अपूर्ण मानली जाते. तेव्हापासून शालिग्राम आणि तुळशीचा विवाह प्रभु विष्णू आणि महालक्ष्मीच्या विवाहाचे प्रतीकात्मक विवाह लावतात.अशी आख्यायिका तुळशी विवाह निमित्त ह.भ.प.समाधान महाराज पगार आणि ह.भ.प. वैभव महाराज मोरे सांगितली.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.