
सविस्तर वृत्त असे की, गेल्या काही दिवसापासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे निफाड तालुक्यातील वनसगाव, उगाव, सारोळा ,खडक माळेगाव ,टाकळी ,कोटमगाव, वेळापूर ,आंबेगाव ,लासलगाव, विंचूर , थेटाळे विठ्ठलवाडी या गावांमध्ये हाती आलेले पिकांचेअतोनात नुकसान झाले आहे मका सोयाबीन ,खरीप कांदा, कांदा बियाणे (उळे) द्राक्ष पिकांची नुकसान झाले त्याचबरोबर कांद्याचे बियाणे खराब झाले आहे महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे व तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे शेतकऱ्यांचे परतीच्या पावसामुळे अतोनात नुकसान होत असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे निफाड तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या या संकटाच्या वेळी कधी धावून येणार . शेतकऱ्यांच्या अश्रू पूसतील का असा प्रश्न शेतकरी वर्ग करत आहे. तरी महसूल व कृषी विभागाने तातडीने बैठक घेऊन त्वरित पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. अशी मागणी होत आहे