ताज्या घडामोडी
भाटगांव ता. चांदवड येथे सालाबादप्रमाणे ४० वा अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव- चांदवड तालुक्यातील भाटगांव येथे सालाबादप्रमाणे या ही वर्षी दिनांक १०/१०/२०२४ वार गुरुवार पासून ४० व्या अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ होत असून या नामयज्ञ सोहळ्या मध्ये पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, संध्याकाळी ६ ते ७ हरिपाठ आणि रात्री ९ ते ११ महाराष्ट्रातील नामवंत, दिग्गज कीर्तनकारांची किर्तन सेवा होणार असून या नामयज्ञ
अखंड हरिनाम सप्ताहास भाटगांव येथील ग्रामस्थांनी आणि पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहावे, अशी विनंती सप्ताह कमिटी,आयोजक, समस्त ग्रामस्थ आणि भजनी मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.