चांदवड मध्ये धक्कादायक प्रकार कम्प्युटर क्लास मध्ये विद्यार्थीनीचा विनयभंग
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव- चांदवड येथील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या रेणुका कॉम्प्लेक्स मधील पहिले मजल्यावर असलेले युनिकॉन कम्प्युटर्स चा संचालक शोएब ताहेर नाईक वय वर्ष 31 राहणार चिंचबन चांदवड आणि त्याचा मित्र विशाल गोविंद जाधव वय वर्ष 33 राहणार संताजी संकुल सोमवार पेठ, चांदवड या दोघांनी मिळून क्लास मधील मधील 20 वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऑगस्ट 2024 ते 17 सप्टेंबर 2024 दरम्यान दोन्ही संशयित आरोपींनी आपापसात इशाऱ्याने संगणमत करून फिर्यादी मुलीच्या हाताला, छातीला, मांडीला स्पर्श करत लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचे कृत्य करत विनयभंग केला. पीडित मुलीने विरोध केला असता आम्ही हे आम्ही कोणाला सांगणार नाही तू टेन्शन घेऊ नको असे पीडित मुलीस सांगून, तू विशाल जाधवच्या फ्लॅटवर एकटी ये आम्ही तुझी समजूत काढतो. पीडित मुलगी क्लासमध्ये असताना तिला ऐकू जाईल असे रोमँटिक गाणे लावून, गाणे म्हणून, पीडित मुलगी रस्त्याने जात असता पाठलाग करत आवाज देतात अशी फिर्याद मुलीच्या व तिच्या पालकाच्या तक्रारीवरून चांदवड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. कलम ब 363/2024 बी. एन. एस कलम 75/1, 78,79,126(2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करून दोघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन कोर्टात हजर केले. कोर्टाने त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली असून चांदवड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री. कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची टीम पुढील तपास करत आहे.