बदलापूरच्या “त्या” प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा पोलीसांकडून संशयास्पद एन्काऊंटर…?
ज्ञानेश्वर पोटे

बदलापूर– बदलापुरातील शाळेत अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अक्षय शिंदे ला पहाटेच्या सुमारास बदलापूर पोलीसांकडून अधिक तपासासाठी ठाणे क्राईम ब्रॅंचच्या युनिट क्रमांक १ च्या ताब्यात देत असताना मुंब्रा बायपास जवळ अक्षय शिंदे ने पोलिसांकडून रिव्हॉल्व्हर हिसकावून घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न करत त्याने पोलिसांच्या दिशेने तीन राऊंड फायर केले,यात API निलेश मोरे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्या वर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल स्वरक्षणासाठी अक्षय शिंदे च्या दिशेने फायरिंग केल्याचे बोलले जात असून अक्षय शिंदे चा एन्काऊंटर केला.या घडलेल्या घटने बद्दल विरोधकांनी संशय व्यक्त केला असून, या प्रकरणाची चौकशी केली जाईल असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.