चांदवड तालुका शिवसेना(उ.बा.ठा.) पक्षाच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारा विषयी जाब विचारण्यासाठी चांदवड वीज वितरण कार्यालयावर धडक शेतकरी मोर्चा
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव – चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून प्रसिद्ध असलेले लाल कांदा लागवडीची लगबग चालू असताना वेळी अवेळी इमर्जन्सी लोड शेडिंगच्या नावाखाली भार नियमन करून मोठ्या प्रमाणात नाहक मनस्ताप आणि त्रास सहन करावा लागत आहे. यावर्षी बऱ्या पैकी पाऊस झाला असल्याकारणाने कांदा लागवडीची धावपळ सुरू असून त्यात मजूरांची समस्या, शेतकऱ्यांना कांद्याचे रोप मिळण्यासाठी, लावलेल्या कांद्याना पाणी भरण्यासाठी धावपळ करावी लागत असतानाच,अनियमित विद्युत पुरवठ्याच्या समस्येला शेतकरी बांधवांना सामोरे जावे लागत आहे. एका बाजूला शासन मोठ-मोठाल्या घोषणा करत असताना वास्तव परिस्थिती मात्र विरोधाभासी आहे. वीज वितरण कंपनीने जाहीर केलेले वेळापत्रक अजिबातच पाळले जात नसताना, इमर्जन्सी लोड शेडिंग च्या नावाने मोठ्या प्रमाणामध्ये वेळी अवेळी वीजपुरवठा बंद केला जात आहे, यामुळे शेतकरी बांधव अतिशय त्रस्त झालेले आहेत. गेल्या आठवड्यापासून ग्रामीण भागात सुरू असलेले अमान्य वीज भारनियमन व वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराचा जाब विचारण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ग्रामीण जिल्हाप्रमुख मा. श्री.नितीन दादा आहेर आणि तालुकाप्रमुख श्री.विलास भाऊ भवर यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दि.२३ रोजी सकाळी ११:०० वाजता चांदवड येथील वीज वितरण कार्यालयावर शेतकरी मोर्चा काढण्यात येणार आहे, तरी चांदवड तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या विजेच्या समस्यांचा पाढा वाचण्यास आणि योग्य तो न्याय मिळवून घेण्यासाठी वीज वितरण कंपनीला जाब विचारण्यासाठी चांदवड वीज वितरण कंपनीमध्ये उपस्थित रहावे, असे आवाहन चांदवड तालुका शिवसेना – युवासेना (उ.बा.ठाकरे) यांच्या वतीने करण्यात आले आहे.
तरी तालुक्यातील सर्व शेतकरी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यासाठी वेळेत उपस्थित रहावे, असे सांगण्यात आले आहे.
शेतकरी मोर्चाचे ठिकाण – वार -सोमवार दिनांक २३/०९/२०२४ सकाळी ११.०० वाजता
स्थळ :- वीज वितरण कार्यालय चांदवड.