वनी चौफुली उड्डाणपूला जवळ ट्रक आणि लक्झरी बस मध्येभीषणअपघात, दोन ठार.
नाशिक प्रतिनिधी

पिंपळगाव बसवंत : येथील वनी चौफुली उड्डाणपूला जवळ गुरुवारी (दि.१९) पहाटे ४ च्या सुमारास ट्रक आणि एक लक्झरी बस त्यांच्यामध्ये भीषण अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पिंपळगाव बसवंत येथील उड्डाण पुलाजवळ रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू आहे ,त्यामुळे महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास चांदवड कडून पिंपळगाव ब .कडे येणाऱ्या लक्झरी बस क्रमांक AR 01 R 0027ही चांदवडच्या दिशेने येत असता समोरून येणाऱ्या ट्रक क्र.MH04 FJ 6887 याला जोरदार धडक दिली त्यात ट्रकचा क्लीनर अबूजफर रफिक अहमद (23 )रा. मालेगाव हा जागीच ठार झाला, तर बस चालक अजमेरी युसुफ शहा याला नाशिकमधील रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेत असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला .या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी येऊन बऱ्याच वेळानंतर वाहतूक कोंडी सोडवली.लक्झरीच्या जोरदार धडकेमुळे ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तसेच पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.