श्री स्वामी नरेंद्रचार्य महाराज यांचा 20,21 सप्टेंबरला आशे वाडीला समस्या ,मार्गदर्शन दर्शन सोहळा–
प्रतिनिधी श्री. ज्ञानेश्वर भवर.

सविस्तर वृत्त असे की, अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्य महाराज यांचा येत्या 20 व 21 सप्टेंबर रोजी आशेवाडी येथील रामशेज किल्ल्या जवळील उत्तर महाराष्ट्र उपपीठ येथे भव्य समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा संपन्न होणार आहे विविध प्रकारे भक्तांच्या वतीने कार्यक्रमाचा प्रसार केला जात आहे. अध्यात्म, विज्ञान व व्यवहार या त्रिसूत्रीची सांगड घालून जीवन कसे जगावे याच्याबाबत मार्गदर्शन परमपूज्य जगद्गुरूंच्या अमृतवाणीतून लाभणार आहे त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन, जीवनात येणाऱ्या अनेक समस्या यावरही सखोल मार्गदर्शन होणार आहे संस्थानाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे आजही युवा पिढी चुकीच्या मार्गाने वळण घेत आहे त्यांना त्यांच्या भवितव्य चांगले कसे जगावे व घडेल याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे राष्ट्रीय महामार्गावर संस्थानाच्या वतीने दर 30 किलोमीटर मध्ये 52 रुग्णवाहिका सेवा सुरू आहे ब्लड इन निडच्या माध्यमातून गरजू रुग्णांना रक्तपुरवले जाते यासारखे विविध सामाजिक उपक्रम वर्षभर राबविले जातात. सामाजिक कार्य व सोबतच अध्यात्मिक ज्ञान देणारे जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम सकाळी नऊ वाजल्यापासून चालू होत आहे येणाऱ्या भाविकांच्या सर्व सोयीच्या दृष्टीने भव्य दिव्य मंडप उभारण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे तसेच येणाऱ्यांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे तीन महिन्याच्या प्रतीक्षा नंतर जगतगुरु श्री नरेंद्रचार्य महाराज येत आहे सर्व भाविकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आव्हान नाशिक जिल्हा सेवा समितीने व निफाड तालुका सेवा समिती केले आहे.