महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा योजनेअंतर्गत रानभाजी महोत्सव साजरा——
प्रतिनिधी श्री.ज्ञानेश्वर भवर

सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा योजनेअंतर्गत आज दिनांक 14-8-2024 खरीप हंगामातील पीक सोयाबीन ,मका उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर क्षेत्रिय किसान गोष्टी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे त्याचबरोबर रानभाजी महोत्सवाचे आयोजन श्री. सुधाकर पवार तालुका कृषी अधिकारी निफाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यामध्ये श्री. गणेश वाकळे व्यवस्थापक काँकर प्रायव्हेट लिमिटेड यांनी सोयाबीन व मका कीड रोग व्यवस्थापन अन्नद्रव्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. यानंतर श्री. पवार सर ,तालुका कृषी अधिकारी निफाड यांनी उपस्थितांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेविषयी माहिती देत पुढील रब्बी हंगामातील कांदा रोप वाटिका व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले तसेच श्री.योगेश शिंदे बी .ए. एस. एफ प्रायव्हेट लिमिटेड यांनी कीटकनाशकांची हाताळणी करताना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले त्याचबरोबर श्री.अनिल रायते यांनी विविध रान भाज्यांची ओळख त्यांचे आहारातील महत्त्व याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले व या समयी रानभाजी महोत्सवात विविध रानभाज्यांची व त्यापासून बनवण्यात आलेल्या पाककृती रेसिपी उपस्थित त्यांना दाखविण्यात आली. याप्रसंगी निफाड तालुक्यातील विविध शेतकरी बंधू-भगिनी शेतकरी उत्पादक कंपनी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन श्री धनगर साहेब मंडळ कृषी अधिकारी लासलगाव श्री बच्छाव साहेब तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक निफाड व श्रीमती चव्हाण मॅडम कृषी सहाय्यक खडक माळेगाव यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावचे सरपंच श्री जगदीश पवार व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले .