बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कनाशीच्या मिनी बँक ग्राहक केंद्राचा कारभार आला चहाट्यावर
वैभव गायकवाड

कळवण – तालुक्यातील कनाशी हा पश्चिम पट्ट्यातील आर्थिक व्यवहार चा मुळ ठिकाण.या गावात शासनाने बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सुरू आहे.सरकारी बँक एकच असताना या शाखांमध्ये खुप गर्दी होते . ग्राहकांना त्रास होऊ नये म्हणून पर्यायी ग्राहक सेवा केंद्र चालू केले.पण त्या ग्राहक सेवा केंद्राचे चालक यांनी ग्राहकांच्या पैसावरचं मारला डला. बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कनाशीच्या एक खातेदार बाबुराव सावळीराम बागुल हा खातेदारांच्या अकाऊंटमध्ये साधारण १ लाख ६५ हजार रुपये असताना. अकाऊंट हे आधार लिंकीण असल्यामुळे खातेदार हा ग्राहक सेवा केंद्रांवर व्यवहार करत होता.खातेदार यांनी खातेवर पुन्हा पैसे टाकले असता पासबुक वठवण्यासाठी गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की आपल्या खात्यावरुन पैसे एकाच तारखेला ५२ काढले आहेत ते पैसे कशे व कोणी काढले विचारण्यासाठी ग्राहक सेवा केंद्रांत गेल्यावर एका ग्राहक सेवा चालक यांनी खातेदाराला १३हजार रोख रक्कम दिली व दुसरा ग्राहक सेवा चालक यांनी २६ हजार रुपये अकाऊंटमध्ये टाकले.आणि पासबुकवर पैसे दिले असे लिहुन त्यांच्यावर सही केली. बँक मॅनेजर याला या संदर्भात विचारणा केली असता त्या ग्राहक सेवा केंद्राचे चालकांवर कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले.तसेच खातेदार यांनी अभोणा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली व चौकशी करण्यात आली म्हणून अर्ज करुन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी विनंती केली.