के. के. वाघ शैक्षणिक संकुल, काकासाहेब नगर येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
प्रतिनिधी श्री. ज्ञानेश्वर भवर.

काकासाहेबनगर : के. के. वाघ शैक्षणिक संकुल, काकासाहेब नगर येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री. रामनाथ अण्णा पानगव्हाणे, श्री. रामभाऊ शिंदे, श्री. रघुनाथ दादा कोल्हे आणि भारतीय सैन्य दलातील नायक श्री. प्रवीण जाधव उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलतांना प्राचार्य शरद कदम यांनी भारताच्या बदलत्या स्थितीवर प्रकाश टाकला आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी, आणि वीरांचे स्मरण केले. त्यांनी प्रत्येक भारतीयाने भारताच्या विकासासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमात इंग्लिश स्कूल, ज्युनिअर व सीनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषणे सादर केली. यावेळी संकुलातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. यशवंत पवार व श्री. गणेश आवारे यांनी केले.