1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी गँगस्टर अबू सालेम ला मनमाड रेल्वे स्थानकावर उतरवून कडक सुरक्षा व्यवस्थेत नाशिक रोड कारागृहात आणले
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव- 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी अबू सालेम यास मनमाड रेल्वे स्थानकावर कर्नाटक एक्सप्रेसने दिल्लीवरुन मनमाडला आणण्यात आले.सालेम येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मनमाड रेल्वे स्थानकावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. सालेमला मनमाड रेल्वे स्थानकावर उतरवून कडक सुरक्षा व्यवस्थेत नाशिकरोड कारागृहात हलविण्यात आले.
एका खटल्याच्या सुनावणीसाठी त्याला गुरुवारी मध्यरात्री नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत दिल्लीला नेण्यात आले होते. कारागृहात अत्याधुनिक व्हिडीओ कॉन्फरन्सची सुविधा असतांना गँगस्टर अबू सालेमची प्रत्यक्षात हजेरीसाठी सुरक्षा यंत्रणांना मोठी कसरत करावी लागली,कारण सुनावणी पुढे ढकलल्या मुळे अबू सालेमला परत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत परत नाशिक रोड कारागृहात आणावे लागले.
हत्या होईल अशी अबू सालेमला भीती होती. महिनाभरापूर्वीच सालेमला तळोजा कारागृहातून नाशिक रोड कारागृहात आणण्यात आले होते.