भाटगांव तालुका चांदवड येथे संत शिरोमणी संत सावता महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव- आज सालाबाद प्रमाणे याही वर्षी संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी सोहळ्या निमित्ताने ह.भ.प.समाधान महाराज पगार भाटगांवकर यांची किर्तन सेवा संपन्न झाली. यावेळी पांडुरंगाचे लडिवाळ भक्त संत नामदेव महाराज यांच्या गाथेतील *धन्य ते अरण रत्नाची खाण | जन्मला निधान सावता तो ||* या अभंगाचे सुंदर निरोपण ह.भ.प. समाधान महाराजांनी केले. यावेळी
पहिली चाल ह.भ.प.वैभव महाराज मोरे,ह.भ.प.पवन महाराज भवर यांनी गायली. मृदंगाची साथ ह.भ.प.निलेश महाराज भवर यांनी दिली.
हार्मोनियम साथ ह.भ.प.नवले बाबा यांनी केली व कीर्तनाला साथ ह.भ.प. गणपत महाराज मोरे, ह.भ.प.नवनाथ महाराज पवार, ह.भ.प.म्हसु काका पोटे, ह.भ.प.नामदेव महाराज पोटे, ह.भ.प.परशराम महाराज सोमवंशी, ह.भ.प. उत्तमबाबा गोसावी, ह.भ.प.अनिल भाऊ देशमाने, ह.भ.प.दिलीप महाराज पोटे, ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज गवळी, ह.भ.प.अमोल महाराज भवर, ह.भ.प.शरद भाऊ पोटे, ह.भ.प.शुभम महाराज पोटे, ह.भ.प.राजेंद्र भाऊ मोरे, ह.भ.प.अभिजित महाराज पोटे तसेच समस्त भजनी मंडळ व ग्रामस्थांनी बहुसंख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यानंतर समस्त सावता महाराज मित्र मंडळ भाटगांव यांच्या वतीने महाप्रसादाच्या पंगतीने कार्यक्रमाची सांगता झाली.
संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन समस्त सावता महाराज मित्र मंडळ भाटगांव यांनी केले होते.