
भाटगांव- पुण्याहून काठमांडू ( नेपाळ ) साठी जाणारी लक्झरी बस क्रमांक AR 01 S 0306 ट्रॅव्हल बस सकाळी 8:45 वाजता हॉटेल साई पॅलेस जवळ मालेगाव नाशिक येथे वराणे गावाजवळ स्टेअरिंग रॉड तुटून पलटी झाली, अशी स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा सुरू होती. सामाजिक कार्यकर्ते श्री भागवत झाल्टे हे मालेगाव जात असताना त्यांना बस पलटी झाल्याचे समजले त्यामुळे त्याठिकाणी जाऊन लगेच अग्निशामक दलाला बोलावून मदत करण्यास सुरू केले त्यामुळे सर्वांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामध्ये एक आठ ते दहा वर्षाचा छोटा मुलाचा हात अडकलेला असताना त्याला जेसीबीच्या साह्याने मदत करून बाहेर काढण्यात आले.