लाडकी बहीण योजनेनंतर आता विद्यार्थ्यांसाठी ही खास विद्यावेतन योजनेची घोषणा
नाशिक प्रतिनिधी

आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाच्या शासकीय महापूजेला सुरुवात झाली आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन ,आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यासह अनेक मंत्री ,खासदार देखील या महापूजेसाठी उपस्थित आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत यंदा नाशिक जिल्ह्यातील बाळू शंकर अहिरे (वय 55) ,आशा बाळू अहिरे (वय 50)या वारकरी दाम्पत्याला शासकीय महापूजेसाठी उपस्थित राहण्याचा मान मिळाला आहे. अहिरे हे नाशिक जिल्ह्यातील अंबासन गावचे रहिवासी असून ते मागील सोळा वर्षापासून नियमित पंढरीची वारी करत आहेत . तत्पूर्वी मुख्यमंत्री त्यांनी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित केलेल्या “कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक कृषी पंढरी महोत्सवाचे” उद्घाटन केलं .या कार्यक्रमामध्ये बोलताना शिंदे यांनी शासकीय महापूजेचे औचित्य साधून विद्यावेतन देण्याची घोषणा केली .
मुख्यमंत्री म्हणाले राज्यात शेतकऱ्याचं ,कष्टकराचं ,वार कराचं, कामगाराचं ,सरकार आहे .हे सरकार सर्वांचं भलं कसं होईल हे पाहते . आपल्या सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये म्हणजे वर्षाला 18 हजार रुपये दिले , जातील तसेच त्यांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर दिले जातील या योजनेचे पैसे लवकरच महिलांच्या खात्यात वळवले जातील. या योजनेनंतर मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसाठीही खास विद्यावेतन योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत आपल्या राज्यातील तरुण ज्या कारखान्यात काम करतील (अप्रेंटीशीप) करतील तिथे त्यांच्यासाठी आपलं सरकार पैसे भरणार आहे .इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारने अशा प्रकारची योजना आणली आहे .या योजनेद्वारे बेरोजगारीवर आपण उपाय शोधून काढला आहे . या योजनेअंतर्गत आपले तरुण कारखान्यात काम करतील आणि त्यांना सरकार स्टायपंड देईल.
दरम्यान आषाढी एकादशी यात्रेच्या सोहळ्यासाठी आज 15 लाखाहुन अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. पंढरी नगरी विठू नामाच्या जयघोषाने दुमदुमली आहे चंद्रभागे कडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत.