ताज्या घडामोडी

मनमाड नजीक खादगाव येथे वीज पडून तरुणाचा मृत्यू

ज्ञानेश्वर पोटे

मनमाड- दि.11/06/2024 रोजी नांदगाव तालुक्यात विजांच्या कडकडाटसह जोरदार पावसाने हजेरी लावली.मनमाड नजीक असलेल्या खादगाव येथे दुपारी ४.०० वाजेच्या सुमारास वीज पडून शेतमजूर असलेला विलास जंगलू गायकवाड या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असुन या घटनेने सर्व तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दुपारी अचानक पावसाचे वातावरण झाले व विजांच्या कडकडाट सह जोरदार पावसाला सुरवात झाली.यावेळी आपल्या घराकडे परतत असताना शेतमजुर विलास जंगलु गायकवाड वय २९ वर्ष याच्यावर वीज कोसळली त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सबंधित ठिकाणी खादगावचे पोलिस पाटील यांना घटनास्थळी बोलवुन घेतले, पोलिस पाटील यांनी मनमाड पोलिस ठाण्यात कळवले व तहसीलदार यांना ही माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच तहसीलदार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व मयत कुटुंबीयांचे सांत्वन केले.

अपघात विमा म्हणून मयत कुटुंबीयांस सरकार कडून ४ लाख रुपये मिळवून देण्यासंदर्भात माहिती दिली. जंगलू गायकवाड यांना दीड वर्षाचा लहान मुलगा व तीन महिन्याची मुलगी व म्हातारे आई बाप आहेत.आजच्या या घटनेने नांदगाव तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.अशी सविस्तर माहिती चांदवड तालुका प्रतिनिधी भागवत झाल्टे यांनी दिली.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.