
नई दिल्ली – नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यांच्यासह 72 मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली .त्यानंतर आता खातेवाटप जाहीर करण्यात आला आहे. अमित शहा यांच्यावर पुन्हा एकदा गृहमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे .तर राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण मंत्री पद, परराष्ट्र मंत्रालय जय शंकर यांच्याकडे, महाराष्ट्रातील सहा जणांचा यामध्ये समावेश होता, शपथ घेतल्यानंतर या मंत्र्यांना कोण कोणती खाते मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होतं .अखेर आज ते खाते वाटप जाहीर करण्यात आले आहे . त्यानुसार नितीन गडकरी यांना पुन्हा रस्ते आणि परिवहन वाहतूक मंत्रालय,तर अश्विनी वैष्णव यांना रेल्वे मंत्रालय मिळाले आहे. बिहार मधील घटक पक्ष असलेल्या नितेश कुमार यांनी रेल्वे मंत्रालयाची मागणी केली असल्याची माहिती होती . पण ते खाते भाजपच्या अश्विनी वैष्णव यांच्याकडेच राहणार असल्याचे आता स्पष्ट झाला आहे .
*कोणत्या मंत्रालयाची जबाबदारी कुणाकडे ? पहा संपूर्ण यादी .*
अमित शहा – गृहमंत्री
राजनाथ सिंह – संरक्षण मंत्री
एस जयशंकर – परराष्ट्रमंत्री
नितीन गडकरी – रस्ते आणि परिवहन अश्विनी वैष्णव – रेल्वेमंत्री
जतिन राम – सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग
शोभा करंडजवे – राज्यमंत्री एम एस एम इ
निर्मला सीता रमण – वित्त मंत्रालय शिवराज सिंह चौहान – कृषी मंत्रालय पियुष गोयल – वाणिज्य
अन्नपूर्णा देवी – महिला आणि बाल विकास मंत्रालय
भूपेंद्र यादव – पर्यावरण मंत्रालय
राम मोहन नायडू – नागरी उड्डाण मंत्रालय
जेपी नड्डा – आरोग्य मंत्रालय
सानंद सोनवाल – स्पोर्ट शिपिंग मंत्रालय सीआर पाटील – जलशक्ती
किरण सिरीज – संसदीय कार्यमंत्री धर्मेंद्र प्रधान – शिक्षण मंत्री
*राज्यमंत्री*
श्रीपाद नाईक -गृहनिर्माण आणि ऊर्जा राज्यमंत्री
शोभा करणदाजी -राज्यमंत्री सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
शांतनु ठाकूर। – पोर्ट शिपिंग मंत्रालय राज्यमंत्री