
निफाड- तालुक्यातील नारायणगाव खेरवाडी येथील पत्रकार तथा राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे प्रदेश संघटक विजय केदारे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला असून सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्याचा राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी निषेध नोंदवला असून आरोपींना त्वरित अटक न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पत्रकार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की पत्रकार विजय केदारे हे ओझर आठवडे बाजार करून घरासमोर गाडी पार्क करून गाडीतला बाजार काढत असताना येथील गुंड प्रवृत्तीचे इसम 1. गोरख गौतम पगारे व त्यांचा भाऊ 2. सचिन गौतम पगारे यांनी तू रस्त्यावर गाडी पार्क का केली अशी भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. हे गावगुंड एव्हढ्यावरच न थांबता जवळच असलेल्या दांड्याने मारहाण केली सुरू केली केदारे यांची पत्नी चंद्रकला केदारे या भांडण सोडविण्यासाठी गेल्या असता त्यांनाही या गाव गुंडांनी शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच घरासमोर पार्क असलेली मारुती व्हॅन एम एच 15 ए एच 43 89 या गाडीच्या काचा फोडून नुकसान केले. सायखेडा पोलीस स्टेशन येथे इसम गोरख गौतम पगारे व सचिन गौतम पगारे यांच्या विरुद्ध आज दिनांक 29.5.2024 रोजी भारतीय दंड संहिता कलम 323,324,504,506,427,34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पत्रकार विजय केदारे यांच्या कुटुंबावर झालेला हा हल्ला निंदनीय आहे. वरील इसम व त्यांच्या नातेवाईका पासून केदारे यांच्या जीवितास धोका असून त्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी केली आहे. पुढील तपास सायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास ढोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली.जाधव. आणि वाकळे हे तपास करत आहे.