ताज्या घडामोडी

महाआघाडीच्या प्रतिनिधींची अंबड येथील ईव्हीएम ठेवलेल्या गोदामात वाच ठेवण्यासाठी नियुक्ती .

नाशिक प्रतिनिधी

नाशिक – अंबड येथील ईव्हीएम ठेवलेल्या गोदामातील स्ट्रॉंग रूमवर वॉच ठेवण्यासाठी नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी प्रतिनिधींची नियुक्ती केली आहे .त्यासाठी संबंधित प्रतिनिधींच्या नियुक्तीला जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी मान्यता सुद्धा दिली आहे. राज्यात लोकसभेचे 48 मतदार संघातील पाचही टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून त्या त्या मतदारसंघात उभारण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम सील करून ठेवण्यात आलेले आहेत. त्याभोवती सीआरपीएफ चे जवान व पोलिसांचा खडा पहारा आहे .दि.4 जून रोजी मतमोजणी साठी या रूम उघडल्या जातील .परंतु बारामती मतदारसंघातील स्ट्रॉंग रूमचे सीसीटीव्ही तासभर बंद असल्याची तक्रार खासदार सुप्रिया सुळे यांनी आयोगाकडे केली होती, तर नगर मतदार संघाच्या स्ट्रॉंग रूम मध्ये व्यक्ती आढळल्याचा आरोप आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी केला होता, नुसता आरोपच केला नसून त्या संदर्भातील व्हिडिओ देखील लंके यांनी जारी केला होता. त्यामुळे एकाच खडबड उडाली असून या दोन घटनांच्या पार्श्वभूमीवर नाशिक मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे अलर्ट झालेले आहेत . दोन दिवसापूर्वीच स्ट्रॉंग रूमची सुरक्षा वाढवावी यासाठी शिवसेना ठाकरे गटाने जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली होती, तर वाजे यांनी थेट स्ट्रॉंग रूम परिसरात आपले प्रतिनिधी नेमण्यासंदर्भात जिल्हाधिकारी रजत शर्मा यांना निवेदन दिले होते . त्या अनुषंगाने वाजे यांनी प्राधिकृत केलेल्या 13 प्रतिनिधीच्या नेमणुकीला शर्मा यांनी परवानगी दिली आहे. 4 जून पर्यंत हे प्रतिनिधी सकाळी 7 ते दुपारी 3, दुपारी 3 ते रात्री 9 व रात्री 9 ते सकाळी 7 अशा तीन शिप मध्ये गोदाम परिसरातील सीसीटीव्ही रूम व नियंत्रण कक्षात उपस्थित राहतील.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.