जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रवेशोत्सव साजरा.

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रवेशोत्सव साजरा..*
आज दि,15 जून 2024 , वार शनिवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तताणी केंद्र कुमसाडी ता कळवण जी नासिक या शाळेचा पहिला दिवस शाळा प्रवेशा उत्सव व नवगतांचे इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या बालकांचे तसेच इयत्ता पाचवीसाठी नवीन वर्ग चालू केले तसेच आज शाळेचा पहिला दिवस म्हणून व नवीन विद्यार्थी यांचं आदिवासी पारंपारिक सांभाळ नृत्य लावून तसेच लहान मुलांना फुल गुच्छ व पुस्तके देऊन नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे शाळेतील पहिले पाऊल म्हणून पावलांचे ठसे घेऊन मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले तसेच प्रवेश करताना सर्व महापुरुषांचे फोटो यांना पुष्पहार करून शाळेत प्रवेश करण्यात आले आणि शालेय समिती तसेच गावातील तरुण मित्र मंडळ आणि शिक्षक यांनी सुद्धा सांभाळाच्या तालावर ठेका धरला व मोठ्या उत्साहात शाळेचा पहिला दिवस साजरा करण्यात आला या ठिकाणी उपस्थित, अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी महासंघ महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष सोनू भाऊ गायकवाड,व शाळेचे मुख्याध्यापक पवार सर व शिक्षक साळुंके सर , सरपंच, सजन राऊत, शाळा समिती अध्यक्ष नवनाथ पवार, उपाध्यक्ष राधा राऊत, व धनराज साबळे, हिरामण बागुल, त्र्यंबक वाघमारे, सदाशिव राऊत, शिवाजी राऊत,माया वाघमारे,आदी गावकरी उपस्थित होते..