सुरक्षारक्षकास मारहाण करून एटीएम मधून रक्कम पळविण्याचा प्रयत्न फसला.
सिन्नर प्रतिनिधी

सिन्नर लगत मुसळगाव एमआयडीसी मधील सरस्वत बँकेचे एटीएम फोडण्यास आलेल्या चोरट्यांनी सुरक्षारक्षकास मारहाण करून एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला परंतु चोरट्यांना रोकड चा कॅश वार्ड खोलण्यास अपयश आल्याने रक्कम वाचली मात्र एटीएम मशीनची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान तोडफोड केली आहे. बुधवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी सारस्वत बँकेच्या एटीएम मध्ये प्रवेश करत सुरक्षारक्षकास मारहाण करून त्याचा मोबाईल हिसकावून घेतला व एटीएम मशीन बाहेर ओढून काढली व एटीएम ची तोडफोड केली परंतु मशीनचा कॅश वॉर्ड उघडता न आल्याने त्यातील रक्कम लांबविता आली नाही व ते पसार झाले नंतर सुरक्षारक्षकाने साडेचार ते सहाच्या दरम्यान एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन घडलेली सर्व हकीकत सांगितली असतात तत्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत बाविस्कर ,भगवान शिंदे, रोहित पवार, नवनाथ चकोर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली पुढील तपास एमायडिसी पोलीस करत आहेत.